मुंबई- १२ व्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेला ३० मेपासून सुरुवात होत आहे. आतापर्यंतच्या विश्वकरंडक इतिहासात फलंदाज आणि गोलंदाजांनी जसे वर्चस्व गाजविले तसेच क्षेत्ररक्षकांनीही उत्कृष्ठ झेल घेत विश्वचषक गाजविले आहेत. आतापर्यंत झालेल्या विश्वकरंडकात सर्वाधिक झेल घेण्यात ऑस्ट्रेलिचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिग अव्वल आहे. त्याने विश्वकरंडकातील ४६ सामन्यात २८ अप्रतिम झेल घेतले आहेत.
पाँटिग पाठोपाठ श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने १९९२-२००७ दरम्यान झालेल्या विश्वकरंडकातील ३८ सामन्यांत १८ झेल घेतले आहेत. न्यूझीलंडचा अष्टपैलू माजी खेळाडू ख्रिस क्रेन्सने १९९२-२००३ २८ सामन्यांत १६ झेल घेतले आहेत.
पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकने (१९९२-२००७) ३५ सामन्यांत १६ आणि विंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने ३४ सामन्यात १६ झेल टिपले. भारताचा अनिल कुंबळे सर्वाधिक झेल घेण्याच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत. त्याने १८ सामन्यांत १४ झेल घेतले आहेत.
१९८३ सालच्या विश्वकंरडक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांच्या नावावर २६ सामन्यात १२ झेल घेतल्याची नोंद आहे. सचिन तेंडुलकरनेही ६ विश्वचषकांत २२ सामन्यात ११ झेल घेतले आहेत.