महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 16, 2019, 12:02 PM IST

ETV Bharat / briefs

'केदार जाधव अनफिट असल्यास पंतला संधी द्या'

केदार जाधव विश्वकरंडकात खेळणार की नाही, याचा फैसला २१ मे पर्यंत येऊ शकतो.

केदार जाधव

मुंबई - आयपीएल २०१९ मध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव जखमी झाला आहे. त्यामुळे विश्वकरंडकात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. केदार अनफिट असल्यास त्याच्या जागी तुफान फॉर्मात असलेल्या ऋषभ पंतला संधी द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.


१९८३ च्या विश्वकरंडक विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांनी केदार जाधव फिट नसेल तर त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्याची शिफारस केली आहे. बिन्नी म्हणाला, पंत असा खेळाडू आहे, जो कोणत्याही गोलंदाजाची लय बिघडू शकतो. अर्ध्या तासात किंवा १० षटकात तो सामन्याचा नूर पलटवू शकतो. शॉट सिलेक्शनमध्ये तो चुका करतो. पण त्या चुका सुधारण्यासाठी त्याला जास्तीत जास्त संधी देण्याची गरज आहे, असेही बिन्नी म्हणाले.

केदार जाधव विश्वकरंडकात खेळणार की नाही, याचा फैसला २१ मे पर्यंत येऊ शकतो. तो सध्या त्याच्या दुखापीतवर इलाज करत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पंतने धावाचा पाऊस पडला. पंतला विश्वकरंडकात राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. जर कोणताही खेळाडू अनफिट झाला तर त्याच्या जागी पंतला संधी मिळू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details