महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

रेमडीसिवरची 18 इंजेक्शन सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपलब्ध - रेमडिसिवर इंजेक्शन सोलापूर जिल्हा

राज्य शासनाकडून गंभीर कोविड रुग्णांवर उपचारासाठी 'स्टँडर्ड ट्रिटमेंट प्रोटोकॉल' तयार करण्यात आला आहे. त्यानुसार अत्यवस्थ आणि गरीब रुग्णांच्या उपचारासाठी रेमडीसिवरची अठरा इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 11, 2020, 6:20 PM IST

सोलापूर - जिल्ह्यातील गंभीर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य शासनाकडून 18 रेमडीसिवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याबद्दल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अधिकृत माहिती दिली.

माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे कळविले आहे. राज्य शासनाकडून गंभीर कोविड रुग्णांवर उपचारासाठी 'स्टँडर्ड ट्रिटमेंट प्रोटोकॉल' तयार करण्यात आला आहे. त्यानुसार अत्यवस्थ आणि गरीब रुग्णांच्या उपचारासाठी रेमडीसिवरची १८ इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ती इंजेक्शन जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आली आहेत.

रेमडीसिवर इंजेक्शन हे कोरोनाच्या उपचारासाठी प्रभावी औषध आहे. रेमडीसिवर 'अँटी व्हायरल' इंजेक्शन आहे. इबोला आजाराच्या उपचारासाठी हेच औषध वापरण्यात आले होते. भारतातील सिप्ला, हेट्रो, व मायलान या कंपन्या हे औषध तयार करतात. यामुळे शरीरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होतो. शरीराच्या प्रतिकारशक्तीवर देखील दुष्परिणाम करत नाही, असे आढळले आहे. अमेरिकेत या औषधाची किंमत जवळपास पावणे दोन लाख रुपये आहे. मात्र, भारतात याची किंमत कमी ठेवण्यात आली आहे.

औषधाचा काळाबाजार होऊ नये

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 18 रेमडीसिवर इंजेक्शन उपलब्ध करण्यात आली आहेत. यात वशिलेबाजी किंवा काळाबाजार होऊ नये, अशी आशा आहे. खासगी मेडिकलमध्ये देखील या औषधाचा पुरवठा मुबलक झाल्यास रुग्णांना निश्चितच फायदा होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details