महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवा, छगन भुजबळांचे नरेंद्र मोदींना पत्र - छगन भुजबळ न्युज नाशिक

कोरोना निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्याची मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्याकडे केली आहे.

Bhujbal
Bhujbal

By

Published : Apr 14, 2021, 4:19 PM IST

नाशिक -महाराष्ट्रात कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्याची मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यासाठी भुजबळांनी मोदींना पत्र लिहिले आहे.

काय लिहिलंय पत्रात?

या पत्रामध्ये छगन भुजबळ यांनी लिहीले आहे, की 'महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा आलेख हा वाढता आहे. महाराष्ट्रात दररोज सरासरी ६० हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्या करिता महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर पुढील एक ते दोन दिवसात आणखी कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील गरीब आणि सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी तसेच कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी महाराष्ट्राला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची पुन्हा एकदा गरज आहे'.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात पालकमंत्री भुजबळ यांनी मागच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने केंद्राची ही योजना यशस्वीपणे राबविल्याचा उल्लेख देखील केला आहे. 'एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२०पर्यंत सुरू असलेल्या या योजनेचा लाभ सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने देखील प्रयत्न केले होते. त्याचप्रमाणे मे २०२० मध्ये केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत घोषित केल्याप्रमाणे मे २०२० आणि जून २०२०मध्ये देखील राज्यसरकारने तांदूळ आणि चणाडाळ हा महाराष्ट्रातील ४२ लाख ३० हजार ७३५ रेशनकार्ड नसलेल्या लाभार्थ्यांना वितरीत केला होता' असेही भुजबळांनी पत्रात नमूद केले आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी सध्या 1.40 लाख मेट्रिक टन तांदळाची, तर 2.40 लाख मेट्रिक टन गव्हाची गरज आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या ६ करोड ४७ लाख लाभार्थ्यांपर्यंत आपण हे धान्य पोहोचवू शकतो. त्याचबरोबर १.५१ करोड कार्डधारक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी १५,१०० मेट्रिक टन तूरडाळीची गरज असल्याची माहितीदेखील या पत्रात छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून राज्याला पुढील ६ महिन्यासाठी २५ लाख मेट्रिक टन म्हणजेच प्रत्येक महिन्याला ४ लाख मेट्रिक टन धान्य उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details