रत्नागिरी - जिल्ह्यात गुरुवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत आज काहीशी घट झाली. त्यामुळे तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी जिल्ह्यात 390 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 16 बाधितांचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात 876 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी तालुक्यात -
रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारी आढळले 390 पॉझिटिव्ह रुग्ण; तर 16 जणांचा मृत्यू - रत्नागिरी कोरोना अपडेट 6 मे 2021
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी आढळलेल्या 390 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 235 रुग्ण आरटीपीसीआर तर 155 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी आढळलेल्या 390 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 235 रुग्ण आरटीपीसीआर तर 155 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 25 हजार 239 जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यात गुरुवारी आढळलेल्या 390 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 142, दापोली 29, खेड 18, गुहागर 22, चिपळूण 26, संगमेश्वर 74, राजापूर 43 आणि लांजा तालुक्यात 36 रुग्ण सापडले आहेत.
तर मागील चोवीस तासांत जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 16 रुग्णांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना बळींची संख्या 754 इतकी झाली आहे. चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.98 टक्के जिल्ह्यात आज 876 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 18394 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 72.87 टक्के आहे.