महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

पाकिस्तानी झेंड्यासोबत राखी सावंतची पोज, ट्रोलर्सचा जबरदस्त प्रहार - Trollers fire

राखी सावंतने पाकिस्तानी झेंड्यासोबत पोज देणारा फोटो शेअर केलाय. आगामी धारा ३७० चित्रपटात ती पाकिस्तानी व्यक्तीरेखा साकारणार आहे. या फोटोमुळे ती चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे.

राखी सावंत

By

Published : May 9, 2019, 9:38 PM IST

मुंबई - वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने पाकिस्तानच्या झेंड्यासोबत पोज देत फोटो शेअर केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केल्यानंतर तिची पोज व्हायरल झाली आहे.

यासोबतच राखीने एक व्हिडिओ शेअर केला असून यात तिने हाय स्लीटचा फेदर स्कर्ट परिधान केला असून लो कटचा ब्लाऊज घातलाय. आपण हे सर्व 'धारा ३७०' या चित्रपटासाठी काम करीत असल्याचे तिने म्हटले आहे. काश्मिरी खोऱ्यातील पंडितांना कसा त्रास दिला जातो, पाकिस्तानातून जिहादी कसे पाठवले जातात, याचे या सिनेमात दर्शन घडणार असल्याचे तिने सांगितलंय.

'धारा ३७०' या चित्रपटात राखी एका पाकिस्तानी मुलीचे भूमिका करीत असल्याचे व्हिडिओत सांगते. एकंदरीतच आजवरच्या तिच्या वादग्रस्त वागण्याला शोभणारा हा व्हिडिओ आहे. आता असा व्हिडिओ आणि फोटो शेअर केल्यानंतर चर्चा तर होणारच.

अर्थात तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''माझे भारतावर भरपूर प्रेम आहे, परंतु धारा ३७० मधील ही माझी व्यक्तीरेखा आहे.'' असे असले तरी तिच्या या पोस्टकडे ट्रोलर्सचे लक्ष वेधले गेलंय. तिच्यावर जबरदस्त प्रहार त्यांनी सोशल मीडियावर सुरू केलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details