महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

भारताच्या राष्ट्रीय स्वाभिमानाशी तडजोड नाही - राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

राजनाथ सिंह म्हणाले की, लष्कराच्या पातळीवर मुत्सद्दी चर्चेच्या माध्यमातून हे मुद्दे सोडवले जावेत, यासाठी भारत आणि चीन दोघेही उत्सुक आहेत. मी तुम्हाला खात्री देतो की, भारताच्या राष्ट्रीय स्वाभिमानाशी कोणातीही तडजोड केली जाणार नाही. तसेच मला आमच्या विरोधी पक्षांना खात्री द्यायची आहे की, त्यांना अंधारात ठेवले जाणार नाही. वेळ येताच त्यांना याबद्दल माहिती दिली जाईल.

national news
national news

By

Published : Jun 14, 2020, 5:08 PM IST

नवी दिल्ली -भारत आणि चीनमधील सीमेवरील तणावाच्या प्रार्श्वभूमीवर देशाच्या स्वाभिमानाशी कदापी तडजोड करणार नसल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. रविवारी राजनाथ सिंह यांनी व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून जम्मूच्या भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते.

यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, लष्कराच्या पातळीवर मुत्सद्दी चर्चेच्या माध्यमातून हे मुद्दे सोडवले जावेत, यासाठी भारत आणि चीन दोघेही उत्सुक आहेत. मी तुम्हाला खात्री देतो की, भारताच्या राष्ट्रीय स्वाभिमानाशी कोणातीही तडजोड केली जाणार नाही. तसेच मला आमच्या विरोधी पक्षांना खात्री द्यायची आहे की, त्यांना अंधारात ठेवले जाणार नाही. वेळ येताच त्यांना याबद्दल माहिती दिली जाईल.

काश्मिरमधील 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयावर ते म्हणाले की, काश्मिर खोऱ्यात पूर्वी आयसीसचे झेंडे फडकवले जायचे. परंतू भाजपा प्रणित केंद्राच्या सरकारने परिस्थिती बदलली आहे. त्यांनी अजय पंडित यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करत हे भ्याड कृत्य असल्याचे म्हटले. काश्मिरमध्ये पूर्वी 'काश्मिर आझादी' च्या मागणीसाठी निदर्शने करण्यात येत होती. आणि पाकिस्तान आणि आयसीसीसचे झेंडे दिसायचे. मात्र, आता तिथे फक्त भारतीय ध्वज फडकताना दिसतो, असे सिंह म्हणाले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बारामुल्ला येथील मोहम्मद मकबुल शेरवानी यांनाही आदरांजली वाहिली. ज्यांनी 1947 मध्ये काश्मीर खोऱ्यात भारतीय ध्वज फडकावला होता. “मौसम बाद चुका है’ असे म्हणत त्यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. पाकव्याप्त काश्मिरने अशी मागणी केली पाहिजे की त्यांना पाकिस्तानच्या राजवटीत नव्हे तर भारताबरोबर रहायचे आहे. आणि ज्या दिवशी ते होईल, त्या दिवशी आमच्या संसदेने निश्चित केलेले लक्ष्य पुर्ण झाले असेल, असे सिंग यांनी सांगितले.

संरक्षणाच्या दृष्टीनेही बारत वेगाने पुढे जात आहे. राफेल सारखे लढाऊ विमान सैन्यात सामिल झाल्यावर आपल्या वायूसेनेची ताकद अजून वाढेल. आम्हाला कोणाला भीती दाखवायची नाही, पण स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपली शक्ती वाढवायची आहे," असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details