रत्नागिरी -जिल्ह्यात काल (गुरुवारी) अवकाळी पावसाने हजेरी लावली. चिपळूणसह देवरुख आणि संगमेश्वर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला.
दिवसभर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. तर उन्हामुळे रत्नागिरीकर हैराण झाले होते. सायंकाळी मात्र पावसानं हजेरी लावली. चिपळूण, संगमेश्वर, देवरुख तसेच जिल्ह्यातील आणखी काही ठिकाणी हा पाऊस झाला. या पावसामुळे हवेत काही प्रमाणात गारवा निर्माण झाला.