महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

'अशी' होते पुणे येथील कोविड 19संबंधी कचऱ्याची विल्हेवाट - Covid 19 pune

पुणे शहरात सध्या दररोज कोविड 19 शी संबंधित साधारण 12 हजार किलो वैद्यकीय कचरा तयार होतो. या संपूर्ण कचऱ्याची आरटीओ परिसरातील स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या एका प्लांटमध्ये विल्हेवाट लावली जात असे. मागील काही महिन्यांपासून हा प्लांट बंद पडला आहे. त्यामुळे पुण्यातील सर्व जैववैद्यकीय कचरा तळोदा येथे पाठवला जातो.

Covid 19 garbage
Covid 19 garbage

By

Published : Jul 16, 2020, 5:32 PM IST

पुणे- सध्या मुंबईनंतर पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे मागील 3 महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनासंबंधी जैववैद्यकीय कचरा निर्माण होत आहे. हा कचरा उचलण्यापासून ते नष्ट करण्यापर्यंतच्या कार्यासाठी राज्य शासनाने एक नियमावली काढली आहे आणि त्यानुसारच हा कचरा नष्ट केला जात आहे. दरम्यान, पुणे शहरात दररोज 12 हजार टन कोरोनाशी संबंधित वैद्यकीय कचरा जमा होत असून त्याची विल्हेवाट तळोदा येथे होत असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी मनीषा नाईक यांनी दिली आहे.

क्वारंटाइन सेंटर, आयसोलेशन सेंटर यामध्ये काम करणारे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी यांनी वापरलेले हातमोजे, फेसमास्क, पीपीइ किट आणि इतर उपकरणे एका पिवळ्या बॅगमध्ये एकत्र केले जातात. या बॅग वर कोविड 19 कचरा असे लिहिले जाते. त्यानंतर या कचऱ्यावर जंतुनाशक फवारणी करून विल्हेवाट लावण्यासाठी ते ऑपरेटरला दिले जाते अशी माहिती मनीषा नाईक यांनी दिली.

त्या पुढे म्हणाल्या की, पुणे शहरात सध्या दररोज कोविड 19शी संबंधित साधारण 12 हजार किलो वैद्यकीय कचरा तयार होतो. या संपूर्ण कचऱ्याची आरटीओ परिसरातील स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या एका प्लांटमध्ये विल्हेवाट लावली जात असे. मागील काही महिन्यांपासून हा प्लांट बंद पडला आहे. त्यामुळे पुण्यातील सर्व जैववैद्यकीय कचरा तळोदा येथे पाठवला जातो. आणि त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली जाते.

पुणे महापालिकेच्या वतीने सध्या या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीचे कंत्राट पास्को एन्व्हायरमेंटल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीचे डायरेक्टर सुनील दंडवते म्हणाले, कोविड 19 शी संबंधित कचरा उचलण्यासाठी मार्चमध्ये आमच्याकडे फक्त एक गाडी होती. त्यानंतर आता एकूण सहा गाड्या आहेत. सर्वप्रथम महापालिकेकडून दररोज आम्हाला कचरा कोठे तयार झाला यासंबंधीची माहिती दिली जाते. त्यानंतर आमचे कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन हा कचरा उचलतात. या कर्मचाऱ्यांना संपूर्ण पीपीई कीट, मास्क, शूज, सॅनिटायझर या सर्व वस्तू दिल्या जातात. नियमानुसार या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. कोविड 19 संबंधी 9 टक्क्यांहून अधिक कचरा हा जाळून नष्ट केला जातो.

ABOUT THE AUTHOR

...view details