महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

वीजबील माफ करा, या मागणीसाठी मनसेची पुण्यातील अलका चौकात निदर्शने - Mns oppose mahavitran pune

गेल्या 8 ते 10 दिवसांपासून आम्ही वीज बील माफ करण्यासाठी पत्रव्यवहार करत आहोत. सरकारने वीज बील माफ करावे अन्यथा मनसे यापुढे तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रल्हाद गवळी यांनी दिला आहे.

Pune Mns oppose mahavitran
Pune Mns oppose mahavitran

By

Published : Jun 29, 2020, 6:19 PM IST

पुणे- लॉकडाऊनच्या काळात महावितरणकडून मोठ्या प्रमाणात बीज बिले आली आहेत. लॉकडाऊनमध्ये काहींच्या नोकऱ्या गेल्या आहे, तर मोठ्या प्रमाणात नागरिकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले असताना महावितरणकडून जे 3 ते 4 महिन्यांचे बीज बिल आले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सरकारने बीज बील माफ करावे या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुण्यातील अलका टॉकीज चौकात निदर्शने करण्यात आली आहे. सोशल डिस्टनसिंगचे पालन करत हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणत सरकार विरोधात घोषणा देण्यात आली.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर महावितरणने ऑनलाईन वीज बील भरावे, असे आवाहन केले होते. मात्र, महावितरणकडून जी वीजबिले देण्यात आली ती बघून नागरिकांना धक्काच बसला. मोठ्या प्रमाणत वीज बिलात वाढ करून नागरिकांना वीज बिल देण्यात आले. आज जे आंदोलन करण्यात आले ते सरकारला फक्त इशारा आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांना खायला अन्न नाही, नोकऱ्या नाही असे असताना खंडणीच्या स्वरुपातील जर वीज बिले देणार असतील तर नागरिक बीज बिले भरणार नाही असे मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले.

असंख्य तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. सरकारकडून टप्प्या-टप्प्याने बिले घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र राज्यात कुठेही तसे होताना दिसत नाही. जनतेला लुटणार आणि रोज फक्त येऊन बडबड करणारे ममूंचे सरकार आहे, अशी टिका मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली.

गेल्या 8 ते 10 दिवसांपासून आम्ही पत्रव्यवहार करत आहो की, वीजबील माफ करावे. सरकारने वीज बील माफ करावे अन्यथा मनसे यापुढे तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रल्हाद गवळी यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details