नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील कोरोना परिस्थितीवरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्ला केला आहे. राज्य सरकारने खोटे दावे करण्यापेक्षा, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पारदर्शक उपाययोजना कराव्यात, असे त्या म्हणाल्या.
'योगी सरकारने खोटे दावे करायचे सोडून उपाययोजना कराव्यात!' - प्रियांका गांधी टीका
"लखनऊमध्ये बसून योगी सरकार कोरोनाशी लढाईच्या मोठ्या बाता मारते, मात्र तेथून केवळ दोन किलोमीटर जरी दूर गेले तरी त्यांचे सगळे दावे फोल ठरलेले दिसून येतील. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने काही ठोस आणि पारदर्शक पावले उचलणे गरजेचे आहे." असे ट्विट त्यांनी केले.
"लखनऊमध्ये बसून योगी सरकार कोरोनाशी लढाईच्या मोठ्या बाता मारतात, मात्र तेथून केवळ दोन किलोमीटर जरी दूर गेले तरी त्यांचे सगळे दावे फोल ठरलेले दिसून येतात. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने काही ठोस आणि पारदर्शक पावले उचलले गरजेचे आहे." असे ट्विट त्यांनी केले.
यापूर्वी एका फेसबुक पोस्टमधूनही त्यांनी योगी सरकारवर टीका केली. योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील रुग्णालयांमध्ये दोन लाख खाटा उपलब्ध केल्याचे म्हटले होते, मात्र जसजसे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत; राज्य सरकारचे अपयश अधिक ठळक होत आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. यामध्ये त्यांनी एक अहवालही दिला होता, ज्यात असे सांगितले आहे; की किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही रुग्णालयात खाटा मिळत नाहीयेत.