महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

नांदेड : खासगी रुग्णालयांनी कोरोनाविषयक माहिती देणे बंधनकारक; मनपा आयुक्तांचा आदेश

कोविड - 19 प्रतिबंधक उपचारासाठी केंद्र शासनाने विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याची अंमलबजावणी आयुक्तांनी सुरू केली आहे. यामध्ये सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये एलईडी माध्यमाद्वारे रूग्णालयाच्या प्रथमदर्शनी भागात उपचार घेत असलेल्या कोविड रूग्णांची माहिती देण्याच्या सक्त सूचना खासगी रुग्णालयाला आहेत.

nanded corona news
nanded corona news

By

Published : Jun 14, 2020, 3:14 PM IST

नांदेड - शहरातील सर्व खासगी रुग्णालयाच्या प्रथमदर्शनी भागावर एलईडी माध्यमाद्वारे कोविड-नॉन कोविडसाठी उपलब्ध असलेल्या खाटांची आकडेवारी प्रसिध्द आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहे. त्याच बरोबर उपलबध खेल्या आणि खाटांच्या शुल्कासह रुग्णालयात किती कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच किती रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, याची माहितीही प्रसिध्द करणे बंधनकारक असल्याचे आदेश मनपा आयुक्तांनी इंडियन मेडिकल असोसिएशन जिल्हा शाखेला बजावले आहे.

कोविड - 19 प्रतिबंधक उपचारासाठी केंद्र शासनाने विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याची अंमलबजावणी आयुक्तांनी सुरू केली आहे. यामध्ये सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये एलईडी माध्यमाद्वारे रूग्णालयाच्या प्रथमदर्शनी भागात उपचार घेत असलेल्या कोविड रूग्णांची माहिती देण्याच्या सक्त सूचना खासगी रुग्णालयाला आहेत. त्यासाठी खासगी रुग्णालयाने आपल्या स्तरावर एक नोडल अधिकारी नेमावा.

या नोडल अधिकाऱ्यांना रुग्णालयाची सर्व माहिती असेल. तसेच कोणत्याही रुग्णाला प्रवेश किंवा उपचार सुविधा नाकारल्या जाणार नाहीत याची नोडल अधिकारी यांनी दखल घ्यावी, असे या आदेशात नमूद केले आहे. तसेच रुग्णालयाची माहिती शासनाच्या पोर्टल, अॅप्लीकेशनवर भरण्यात आलेल्या माहितीची पडताळणी करून खात्री करून घेण्यात यावी. मनपाच्यावतीने खासगी रुग्णालय, क्लिनिक, नर्सिंग होम या ठिकाणी कोणत्याही क्षणी नोडल अधिकारी म्हणून मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाप्रसाद कुंटूरकर हे भेटी देवून चौकशी करून तो अहवाल सादर करतील. खासगी रुग्णालय जर आदेशाचे पालन करीत नसतील तर त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी आयएमए जिल्हा संघटनेला दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details