महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

सोलापूर: जिल्हा कारागृहातील कैदी आणि कर्मचारी झाले कोरोना मुक्त - Solapur jail prisoners corona

जिल्हा कारागृह प्रशासनाने कोरोना साथीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उपायोजना करून देखील न्यायाधीन बंदी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यामध्ये 60 पुरुष न्यायाधीन बंदी व दोन महिला न्यायाधीन बंदी हे पॉझिटिव्ह आढळून आले होते.

Solapur district jail
Solapur district jail

By

Published : Jul 13, 2020, 6:36 PM IST

सोलापूर- जिल्हा कारागृहातील कोरोनाची साखळी तोडण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. योग्य खबरदारी घेत केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे कारागृहातील सर्व बंदी व कर्मचारी कोरोना मुक्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

जिल्हा कारागृह प्रशासनाने कोरोना साथीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उपायोजना करून देखील न्यायाधीन बंदी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यामध्ये 60 पुरुष न्यायाधीन बंदी व दोन महिला न्यायाधीन बंदी हे पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्याचबरोबर कार्यालय आस्थापनेतील 13 पुरुष कर्मचारीदेखील कोरोना पॉझिटिव आढळून आले होते. हे सर्व 75 जण आता कोरोना मुक्त झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व कैद्यांचे शासकीय तंत्रनिकेतन येथील मुलांच्या वसतिगृहात अलगीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या वसतीगृहास सोलापूर महानगरपालिकेकडून कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात आले. महानगरपालिकेकडून सर्व बधितांवर उपचार सुरू करण्यात आले. योग्य वेळेत उपचार मिळाल्याने सर्व कैदी व कर्मचारी कोरोना मुक्त झाले आहेत.

तसेच, कोविड सेंटरसाठी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर कारागृहातील कर्मचारीदेखील येथे होते, असे प्रभारी कारागृह अधिक्षक डी.एस. इगवे यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने केलेल्या योग्य खबरदारीमुळे कारागृहातील कोरोनाची साखळी तोडण्यास यश आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details