महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

पुरुषांमधील शीघ्रपतन.. जाणून घ्या काळजी करण्याची गरज आहे की नाही? - Premature Ejaculation problem news

शारीरिक संबध ठेवताना जर एखाद्या पुरुषाचे एक मिनिटाच्या आत वीर्य सख्खलन होत असेल तर शीघ्रपतन होते असे समजतात. हे प्रमाण सर्वसामान्य व्यक्तीमध्ये 3 ते 5 मिनिटापर्यंत आहे. त्यामुळे जर एक मिनिटांपेक्षा कमी वेळात विर्य सख्खलन होत असेल तर हा चिंतेचा विषय आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 8, 2020, 9:06 PM IST

शारीरिक संबंध हा पुरुष आणि स्त्रीमधील नात्याचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे दोघांमध्ये फक्त घनिष्ट संबंधच प्रस्थापित होत नाहीत, तर नातेसंबंध आणखी घट्ट आणि मजबूत होण्यास मदत होते. इतर कोणत्याही शारीरिक व्याधीप्रमाणे लैंगिक संबंधातील अडथळा तुमच्या जीवनात अडचण निर्माण करू शकतो. पुरुषामधील अशीच एक समस्या म्हणजे शीघ्रपतन. मात्र, ही समस्या उपचारानंतर पूर्णपणे दुर होऊ शकते.

शारीरिक संबध ठेवताना जर एखाद्या पुरुषाचे एक मिनिटाच्या आत वीर्य सख्खलन होत असेल तर शीघ्रपतन होते असे समजतात. हे प्रमाण सर्वसामान्य व्यक्तीमध्ये 3 ते 5 मिनिटापर्यंत आहे. त्यामुळे जर एक मिनिटांपेक्षा कमी वेळात विर्य सख्खलन होत असेल तर हा चिंतेचा विषय आहे.

शीघ्रपतन होण्यामागे अनेक कारणे आहेत. आताच्या काळात पुरुषांमध्ये शीघ्रपतन मोठ्या प्रमाणात का होते? याची कारणे अ‌ॅन्ड्रॉलॉजीस्ट डॉ. राहुल रेड्डी यांनी सांगितली. अश्लील(पॉर्न) व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण आताच्या पिढीमध्ये वाढले आहे. तसेच अनेकजण खुप तरूण वयात हस्तमैथुन करण्यास सुरुवात करतात. सध्या शीघ्रपतनाची समस्या पुरुषांमध्ये जास्त आढळण्याचे हे एक मोठे कारण आहे. ही समस्या पुरुषांच्या सर्व वयोगटात आढळते. तरुणपणात आणि वय झाल्यानंतरही ही अडचण उद्भवू शकते, असे डॉ. राहुल रेड्डींनी सांगतात.

शीघ्रपतनाचे दोन प्रकार

1) स्थायी (परमनंट) शीघ्रपतन

2) दुय्यम(सेकंडरी) शीघ्रपतन

पहिल्या प्रकारातील म्हणजे स्थायी शीघ्रपतन प्रकारात ही समस्या एखाद्या पुरुषात नैसर्गिकपणे असते. ती नंतरच्या काळात निर्माण झालेली नसते. तर प्रथमपासून त्याला समस्या असते.

दुसऱ्या प्रकारातील म्हणजे दुय्यम(सेकंडरी) शीघ्रपतनाची कारणे

व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या घटकांमुळे ही समस्या निर्माण होते. शरिरात स्त्रवणाऱ्या हार्मोनचे(संप्रेरके) असंतुलन, शारीरिक संबध ठेवतानाचा तणाव(परफॉरमन्स स्ट्रेस), नातेसंबंधातून आलेला तणाव, चिंता किंवा एखाद्या कृत्याबाबत अपराधीपणाची भावना अशी कारणे असू शकतात. या प्रकारात शीघ्रपतनाची अडचण हळूहळू निर्माण होते. ती आधीपासून पुरुषामध्ये नसते. आणखी कारणे म्हणजे, लिंगावरील संवेदनशील त्वचा, कठोर त्वचा ही शीघ्रपतन होण्यास कारणीभूत असू शकते.

शीघ्रपतनाच्या प्रकारानुसार त्याच्या उपचार पद्धती वेगवेगळ्या आहेत. ज्या पुरुषांमध्ये स्थायीपणे ही समस्या आहे. त्यांचे समूपदेशन, मानसोपचार, रिलॅक्सेशन टेकनिक, स्टॉप अ‌ॅन्ड स्टॉर्च पद्धती यासोबतच ओटीपोटाच्या स्नायूंचा व्यायाम करण्यातून दुर करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ही अडचण दुर करण्यासाठी मानसिक परिवर्तन करण्यावर डॉक्टर लक्ष केंद्रित करतात. ज्या व्यक्तींमध्ये इतर दुसऱ्या कारणांनी शीघ्रपतनाची समस्या निर्माण होते. त्यांच्यावर ती कारणे शोधून उपचार केला जातो, असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

वर सांगितलेल्या सर्व मुलभूत उपचार पद्धती आहेत. बाकी वेळा उपचार औषधे देऊन करण्यात येतात. 80 टक्के पुरुष औषधांना प्रतिसाद देतात आणि त्यांच्यातील शीघ्रपतनाची समस्या दुर होते. मात्र, काही जणांमधील समस्या जात नाही. ज्या पुरुषांमध्ये शीघ्रपतन मानसिक तणावामुळे घडून येते, त्यांच्यावर औषधांचा परिणाम होत नाही. कारण तणावामुळे गोळ्याची परिणामकारकता कमी होते. काही प्रमाणात शस्त्रक्रिया हा पर्याय वापरुनही उपचार केले जातात. मात्र, शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय असतो.

शीघ्रपतन हा चिंतेचा विषय आहे, कारण यामुळे अनेकांच्या लैंगिक जीवनावर परिणाम होतो. नातेसंबधात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा मोठा चिंतेचा विषय आहे. वयाच्या 13 व्या 14 वर्षापासून हस्तमैथुन आणि अश्लील व्हिडिओ पाहणे ही या समस्येमागील मोठी कारणे आहेत. तणावरहित जीवन आणि शारीरिक संबध ठेवताना आपला परफॉरमन्स कसा असेल याची चिंता न करणे हे शीघ्रपतनावरील महत्त्वाचे उपाय आहेत, असे डॉ. राहुल रेड्डी यांनी सांगितले. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही डॉ. राहुल रेड्डी यांना andrologistdoctor@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधू शकता.

ABOUT THE AUTHOR

...view details