नाशिक- येवल्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर व मास्क न लावणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करा, असे आदेश देण्यात आले. त्यानंतर, शहरातील गंगादरवाजा, विंचूर चौफुली या भागात पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या व मास्क न लावणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली.
येवल्यात मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई - Police fined triple seat drivers yewla
अनेक दुचाकीस्वार हे ट्रिपल सीट तसेच मास्क न लावता दुचाकी चालवत होते. अशा दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत त्यांच्याकडून दंड वसूल केला.
Police action yewla
अनेक दुचाकीस्वार हे ट्रिपल सीट तसेच मास्क न लावता दुचाकी चालवत होते. अशा दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत त्यांच्याकडून दंड वसूल केला, तसेच मास्क लावा व विनाकारण दुचाकीवर फिरू नका अशा सूचना दिल्या. यावेळी पोलीस दिसताच अनेक दुचाकीस्वारांनी मास्क लावले. अशा दुचाकीस्वारांना पोलिसांनी आपला खाक्या दाखवत त्यांच्या गाडीच्या चाव्या काढून घेतल्या व त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली.