हिंगोली -निवासी उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यात खासगी गाडीवर लावलेल्या अंबारी दिव्यावरून प्रचंड वाद झाला. हा वाद पोलीस ठाण्यात गेला असून पोलीस अधिकाऱ्यांनी निवासी उप जिल्हधिकाऱ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या वादात जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांनी उडी घेतली असून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात दिलेली तक्रार खोटी असल्याचे सांगत ती मागे घेण्याची मागणी केली आहे. एकंदरीतच या मागणीमुळे मात्र पोलिसांच्या वादाला खरोखरच खोटेपणाची फोडणी देण्याचाच प्रयत्न सुरू आहे.
हिंगोलीत शनिवारपासून निवासी उपजिल्हाधिकारी आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरिक्षक अनमोड यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. हा वाद एवढा पेटला की, आरडीसी यांनी ठाण्यात गेल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शेख यांच्या समोर देखील अनमोड यांना अरेरावी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी हे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शहरात सामाजिक सुरक्षा आणि लोकांकडून मास्कचा वापर होतो की नाही. हे पाहण्यासाठी स्वतःचे खासही वाहनाने (एम. एच. 23 एस. 7223) आले होते. तेव्हा हा सर्व वाद घडला. परंतू निवासी जिल्हाधिकारी हाफ चड्डीवर पाहणी करण्यासाठी कसे काय आले? तसेच ते ज्या गाडीतुन आले त्या गाडीवर दिवा लावण्याची परवानगी असेल तर ती परवानगी जाग्यावरच उप निरिक्षक अनमोड यांना का दाखविली नाही. पोलीस स्टेशनला गाडी घेऊन का गेले ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.