महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

दुकानांसंदर्भात ठाणे पालिकेची ऑर्डर गोंधळात टाकणारी, पोलिसांकडून सुधारित आदेशाची मागणी - ठाणे पालिका बातमी

महापालिके च्या आदेशानुसार, कोर्ट नाका ते पुढे बाजारपेठेतील दुकाने सम-विषम तारखेनुसार उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, याअंतर्गत येणाऱ्या छोट्या-मोठया गल्ल्यांविषयी यात कोणताच स्पष्ट उल्लेख किंवा आदेश नाही. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याविषयी सुधारित आदेश काढण्याच्या सूचना पोलिसांनी पालिका प्रशासनाला  केल्या आहेत .

police-demand-new-directions-after-confusing-order-from-thane-municipal-corporation-regarding-shops
दुकाने उघडण्यासंदर्भात ठाणे पालिकेची ऑर्डर गोंधळात टाकणारी

By

Published : Jun 5, 2020, 1:28 PM IST

Updated : Jun 5, 2020, 2:14 PM IST

ठाणे -प्रतिबंधित क्षेत्र वगळता आज ठाण्यातील सर्व दुकाने सशर्त उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोपरी-नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील दुकाने उघडण्यासंदर्भात काढण्यात आलेला आदेश हा गोंधळ निर्माण करणारा आहे. या आदेशाबाबत पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. याविषयी सुधारित आदेश काढण्याची सूचना महापालिकेला करणार असल्याचे नौपाडा पोलोस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी म्हटले आहे.

दुकानांसंदर्भात ठाणे पालिकेची ऑर्डर गोंधळात टाकणारी

महापालिके च्या आदेशानुसार, कोर्ट नाका ते पुढे बाजारपेठेतील दुकाने सम-विषम तारखेनुसार उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, याअंतर्गत येणाऱ्या छोट्या-मोठया गल्ल्यांविषयी यात कोणताच स्पष्ट उल्लेख किंवा आदेश नाही. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या आदेशात या दुकानांविषयी कोणतेच निर्देश नसताना आज या लहान-मोठ्या गल्ल्यांमधील दोन्ही बाजूंची काही दुकाने उघडण्यात आली आहेत. येथील भागात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे कठीण होणार आहे. यामुळे या गल्ल्यांविषयी योग्य त्या निर्देशांसह सुधारित आदेश काढण्याच्या सूचना पोलिसांनी पालिका प्रशासनाला केल्या आहेत .

गेले दीड ते दोन महिने ठाण्यातील दुकाने पूर्णपणे बंद असल्याने अर्थकारण पूर्ण थांबले होते. आजअखेर दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोपरी आणि नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. यामुळे या परिसरातील दुकाने सम-विषम तारखेला उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र कोर्ट नाका ते पुढे बाजारपेठेपर्यंत दोन्ही बाजूंची दुकाने काही प्रमाणात उघडण्यात आली आहेत. ठाणे महापालिकेची ही ऑर्डर गोंधळात टाकणारी आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सुधारित ऑर्डर काढावी, अशी आपण ठाणे महापालिकेला सूचना करणार आहोत, असे ते म्हणाले. तसे नाही झाले तर सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे फार कठीण जाणार आसल्याचे सोमवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

Last Updated : Jun 5, 2020, 2:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details