धुळे- शहरा जवळील नगावबारी येथील बाफना रुग्णालय या कोविड केअर सेंटरमधून सायंकाळी 15 कोरोना संशयित रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली होती. याबाबत कोविड केअर सेंटरच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पश्चिम देवपूर पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर, पोलिसांनी अवघ्या काही तासातच संशयित रुग्णांना पकडले आहे. कोविड सेंटरमध्ये योग्य सोयी-सुविधांचा अभाव असल्याने या रुग्णांनी पळ काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
धुळे : रुग्णालयातून पळालेल्या 15 संभाव्य कोरोना रुग्णांना पोलिसांनी अवघ्या काही तासात पकडले - 15 corona suspect absconding dhule
जिल्ह्यातील कोविड सेंटरमधून रुग्ण पळून जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. पळून गेलेल्या रुग्णांमुळे कोरोनाचा प्रदूर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असते. मात्र वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे कोविड सेंटर येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
![धुळे : रुग्णालयातून पळालेल्या 15 संभाव्य कोरोना रुग्णांना पोलिसांनी अवघ्या काही तासात पकडले प्रतिकात्मक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-04:27:00:1593946620-mhdhulecoronaupdate7204249-05072020162414-0507f-1593946454-79.jpeg)
नगावबारी येथील कोविड केअर सेंटरमधून मुकटी येथील 3 जण व हेंकळवाडीतील 7 जण तसेच मुकटी येथील आणखी 5 जण, असे 15 जण पळून गेले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोरोना तपासणीसाठी या संशयित रुग्णांचे नमुने लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. परंतु त्यांचे कोरोना तपासणीचे अहवाल येण्याआधीच या संशयितांनी रुग्णालयातून पळ काढला होता. यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. रुग्णांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे युद्धपातळीवरती प्रयत्न केले जात होते. अखेर या संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील कोविड सेंटरमधून रुग्ण पळून जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. पळून गेलेल्या रुग्णांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असते. मात्र वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे कोविड सेंटर येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रुग्णांच्या पळून जाण्यामागील कारणे शोधून त्यावर आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. या आधी देखील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून काही रुग्णांनी पळ काढल्याचा प्रकार समोर आला होता. आशा घटना रोखण्यासाठी कोविड सेंटर येथे सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे.