भीमाशंकर परिसरात भाविक व पर्यटकांच्या 283 वाहनांवर पोलिसांची कारवाई - भिमाशंकर पर्यटक गर्दी
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी भीमाशंकर परिसरात पर्यटन व भाविकांना येण्यास बंदी घातली आहे. तरीही पर्यटक व भाविक भीमाशंकर परिसरात येत आहेत. त्यामुळे घोडेगाव पोलिसांनी नाकाबंदीच्या माध्यमातून 53 हजार रुपयांचा दंड वसूल करून 283 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
![भीमाशंकर परिसरात भाविक व पर्यटकांच्या 283 वाहनांवर पोलिसांची कारवाई घोडेगाव पोलीस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11:43:01:1595916781-mh-pun-3-bhimashankarkarwai-visbyte-mh10013-27072020174529-2707f-02220-945.jpg)
नाशिक - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर मंदिर बंद असतानाही भाविक व पर्यटक भीमाशंकर परिसरात येत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नाका-बंदीत दंडात्मक कारवाई करून तत्काळ 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मागील आठ दिवसात 283 वाहनचालक, भाविक व पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करून कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी भीमाशंकर परिसरात पर्यटन व भाविकांना येण्यास बंदी घातली आहे. तरीही पर्यटक व भाविक भीमाशंकर परिसरात येत आहेत. त्यामुळे घोडेगाव पोलिसांनी नाकाबंदीच्या माध्यमातून 53 हजार रुपयांचा दंड वसूल करून 283 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मंचर भिमाशंकर मार्गावरील घोडेगाव- तळेघर आणि भीमाशंकर या तीन ठिकाणी घोडेगाव पोलिसांनी नाकाबंदी लावून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे भीमाशंकर परिसरात येणारे भाविक व पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करून तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी व भाविकांनी भीमाशंकर परिसरात न येण्याचे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी केले आहे