नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. त्यांच्या प्रसिद्धीचा आलेख वाढतच असल्याची माहिती आज ट्विटरवरून समोर आली आहे. ट्विटरवर मोदींच्या फॉलोवर्सची संख्या वाढली असून ती 6 कोटी झाली आहे.
ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत वाढ.. फॉलोवर्सचा आकडा 6 कोटी पार - पंतप्रधान मोदी ट्विटर फॉलोविंग
2019 मध्ये मोदींना ट्विटरवर 5 कोटी लोक फॉलो करत होते. त्याचवर्षी मोदी पुन्हा पंतप्रधान झाले होते. त्यानंतर 10 महिन्यांनी पुन्हा मोदी यांच्या फॉलोवर्सची संख्या वाढली असून ती 6 कोटी झाली आहे.
देशातील नागरिकांशी चर्चा करणे, तसेच राजकीय भाष्य करण्यासाठी पंतप्रधान मोदी ट्विटरचा उपयोग प्रभावीपणे करतात. 2009 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी ट्विटरवर आपले खाते उघडले होते. आज पंतप्रधान असताना मोदी हे ट्विटरवरील 2 हजार 354 खात्यांना फॉलो करत आहेत. 2019 मध्ये मोदींना ट्विटरवर 5 कोटी लोक फॉलो करत होते. त्याचवर्षी मोदी पुन्हा पंतप्रधान झाले होते. त्यानंतर 10 महिन्यांनी पुन्हा मोदी यांच्या फॉलोवर्सची संख्या वाढली असून ती 6 कोटी झाली आहे.
फॉलोवर्स वाढीबाबत विचार केल्यास पंतप्रधान मोदी हे जगात तिसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प असून पाहिले स्थान अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी पटकविले आहे. यात भारतातील नेतेगणांचा विचार केल्यास मोदी यांच्यावर नेहमी टीका करणारे राहुल गांधी यांचे ट्विटरवर दीड कोटी फॉलोवर्स असून ते 267 खातेधारकांना फॉलो करतात. राहुल गांधी यांनी एप्रिल 2015 या वर्षी ट्विटरवर खाते उघडले होते.