महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

गो एअरचा प्रशिक्षणार्थी पायलट आसिफ खान निलंबित, पण आक्षपार्ह टिप्पणीमुळे नव्हे; गो-एअरचे स्पष्टीकरण - Trainee pilot Khan suspended

याप्रकरणाचा चौकशी अहवाल येईपर्यंत खान याला निलंबित केले असून मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमार्फत या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

news delhi
khan-suspended-not-removed-for-alleged-hateful-comments-goair

By

Published : Jun 8, 2020, 4:51 PM IST

नवी दिल्ली - विद्वेष पसरवणारे ट्विट केल्याप्रकरणीप्रशिक्षणार्थी पायलट असिफ खानने सेवेतून बडतर्फ केल्याच्या वृत्ताचे खंडन गो-एअर कंपनीने केले आहे. बजेट एअरलाइन्स कंपनीने सोमवारी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्याली केवळ निलंबित करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात आसिफ खानच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील आक्षेपार्ह आणि विद्वेषपूर्ण ट्विटवरून वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात एअरलाइन्सने ट्विटरद्वारे एक निवेदन जारी केले आहे.

आम्ही आसिफ खानला सेवेतून बडतर्फ केलेले नाही. परंतु सध्या तरी या पायलटला निलंबित केले असल्याचे गो एअरच्या प्रवक्त्याने ईटीव्ही भारतला सांगितले. खान याचे ट्विटर खाते हॅक करून त्यावरून ही आक्षेपार्ह पोस्ट केल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणाचा चौकशी अहवाल येईपर्यंत खान याला निलंबित केले असून मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमार्फत या प्रकरणाचा तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर खान याने आपली बाजू मांडताना म्हटले की, त्याने अशा प्रकारची कोणतीही निंदनीय टिप्पण्णी कोणाविरुद्ध केलेली नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तर माझ्या आई आणि बहिणीला बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. हे सर्व चुकीच्या ओळखीमुळे आणि माझ्यासारखेच नाव असलेल्या व्यक्तीने पवित्र हिंदू देवाबद्दल अपशब्द वापरल्यामुळे होत असल्याचे खानने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details