महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

औरंगाबाद : भांडणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेवर बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय पीडित महिला २९ एप्रिलला शेतात काम करत असताना गायरान जमिनीत कल्याण पवार, सतीश काळे या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पुढे दोघांमध्ये हाणामारीला सुरुवात झाली.

Aurangabad rape news
औरंगाबाद बलात्कार बातमी

By

Published : May 9, 2021, 4:34 PM IST

औरंगाबाद -येसगाव शिवारातील किरकोळ कारणातून २९ एप्रिलला भांडण झाले होते. यात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून तीन आरोपींनी पीडितेला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून दोघांनी महिलेवर अत्याचार केला, असा आरोप पीडित महिलेने केला. याप्रकरणी, सात दिवसांनी वाळूज पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय पीडित महिला २९ एप्रिलला शेतात काम करत असताना गायरान जमिनीत कल्याण पवार, सतीश काळे या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पुढे दोघांमध्ये हाणामारीला सुरुवात झाली. त्यावेळी पीडित महिलेने मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून मुख्य आरोपी कल्याण जायफुल्या पवार, केशव वाल्या पवार व विशाल मिठू पवार (सर्व रा. येसगाव, ता. गंगापूर) यांनी पीडितेला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. त्यानंतर केशव व विशाल यांनी पीडितेला धरून ठेवले. तर कल्याणने अत्याचार केल्याचा उल्लेख महिलेने पोलिसांनी घेतलेल्या जबाबात दिला आहे. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेतील मुख्य आरोपीची त्याच दिवशी रात्री धारदार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याची घटना घडली. त्यामुळे या आरोपात किती तथ्य आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details