नवी दिल्ली- सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 40 पैसे तर डिझेलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर 45 पैसे वाढ झाली आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ; पेट्रोल 40, तर डिझेल 45 पैशांनी वाढले - New Delhi news
पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 40 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 45 पैसे वाढ झाली आहे. चार दिवसांत पेट्रोल 2.14 रुपये आणि डिझेल 2.23 रुपये प्रतिलिटर एवढी दरवाढ झाली आहे.
पेट्रोल डिझेल दरवाढ
दिल्लीत प्रतिलिटर पेट्रोलसाठी 73.40 रुपये मोजावे लागलणार आहे. तर डिझेलचा दर 71.62 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. राज्य सरकारांनी विक्रीकर आणि इतर कर पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर लावल्यामुळे संपूर्ण देशात इंधन दरात वाढ झाली आहे.
रविवारपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या किंमतीचा उत्पादन खर्चासोबत तुलनात्मक आढावा घ्यायला सुरुवात केली. तेव्हापासून पेट्रोल 2.14 रुपये आणि डिझेल 2.23 रुपये प्रतिलिटर एवढी दरवाढ झाली आहे.