महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

पदार्पणतच शतक झळकावणारा पाकचा आबिद अली सचिनला मानतो आदर्श - sachin tendulkars

३१ वर्षीय अलीला चौथ्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्याने शतकी खेळी साकारली. त्यात त्याने ११२ धावांची खेळी केली.

आबिद अली

By

Published : Mar 30, 2019, 8:12 PM IST

शारजाह - सध्या भारतात आयपीएलचा मौसम सुरू आहे तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात यूएईमध्ये एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ४-० अशी विजयी आघाडी घेतली. यातील चौथ्या सामन्यात पाकिस्तानच्या आबिद अलीने पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सामन्यानंतर अलीने सचिन तेंडुलकरांचे कौतुक केले. यावेळी त्याने आपण शॉट सिलेक्शन सचिनकडून शिकल्याचे त्याने सांगितले. अली तेंडुलकरला आदर्श मानतो. रिकी पाँटिग आणि पाकिस्तानचा इंझमाम-उल-हल हादेखील अलीचा आवडता खेळाडू आहे.

३१ वर्षीय अलीला चौथ्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्याने शतकी खेळी साकारली. त्यात त्याने ११२ धावांची खेळी केली. पाकिस्तानचा नियमित सलामीचा फलंदाज इमाम उल हक हा आजारी असल्याने त्याच्या जागी अलीला खेळण्याची संधी देण्यात आली होती. अलीचे हे शतक संघाला विजय मिळवून देण्यात कामी आले नाही. पाकचा ६ धावांनी पराभव झाला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details