लंडन - विश्वचषकाच्या तयारीसाठी पाकिस्तान संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान येथे एक टी-२० सामना आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल. येथे पाकिस्तानचा संघ सध्या सराव सामने खेळत आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदची बेशिस्त वर्तवणूक दिसून आली आहे.
भर मैदानात सर्फराजने आझमला मारली लाथ - undefined
यादरमन्यान २९ एप्रिल रोजी नॉर्थहॅम्पटनशायरविरुद्धच्या सराव सामन्यात पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळविला.
![भर मैदानात सर्फराजने आझमला मारली लाथ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3191321-224-3191321-1556987132368.jpg)
नॉर्थहॅम्पटनशायर संघ फलंदाजी करत असताना पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद बाबर आझमजवळ येऊन त्याच्याशी बोलला आणि नंतर परत जाताना त्याने बाबरला जोराने लाथ मारली. सर्फराजचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पाकिस्तानी मीडियातदेखील हा व्हिडिओ वारंवार दाखविला जात आहे.
यादरमन्यान २९ एप्रिल रोजी नॉर्थहॅम्पटनशायरविरुद्धच्या सराव सामन्यात पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळविला. नॉर्थहॅम्पटनशायर संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २७३ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात पाकिस्तानने हे आव्हान २ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.