इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी इस्लामाबाद येथे त्यांच्या निवासस्थानी विश्वकरंडकासाठी निवडलेल्या संघाची भेट घेतली. खान यांनी खेळाडूंसोबत त्यांचे अनुभव शेअर केले. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे १९९२ साली झालेल्या विश्वकरंडकात बाज मारली होती. अंतिम सामन्यात इंग्लंडला २२ धावांनी पराभूत करत विश्वकरंडकावर नाव कोरले होते.
त्यानंतर पाकिस्तानला एकदाही विश्वकरंडक जिंकता आला नाही. १९९९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या सामन्यात वसीम अक्रमच्या नेतृत्वाखाली पाकचा संघ दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याच्या मार्गावर होता. मात्र स्टीव वॉच्या संघाने पाकचे मनसुबे उधळून लावले.