बंगळुरू (कर्नाटक) - अंतराळ क्षेत्र खासगी संस्था आणि कंपन्यांसाठी खुले केले, तर देशाच्या विकासासाठी हे क्षेत्र मोठे योगदान देऊ शकेल, असे प्रतिपादन 'भारतीय अवकाश संशोधन संस्थे'चे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी केले आहे. ते गुरुवारी बंगळुरू येथे बोलत होते. खासगी संस्थांसाठी अवकाश क्षेत्र खुले केल्यामुळे भारत हा जागतिक अंतराळ क्षेत्रातही महत्वाची भूमिका बजावेल असेही सिवन म्हणाले.
'...तर जागतिक अंतराळ क्षेत्रात भारत महत्वाचा ठरेल' - Private sector
देशाच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी अवकाश क्षेत्र तयार असून, जागतिक अंतराळ क्षेत्रामध्ये भारत स्पर्धा निर्माण करू शकेन.
जर अंतराळ क्षेत्र खासगी गुंतवणूकदार आणि संस्थांशी खुलं केलं, तर देशाच्या भविष्याच्या दृष्टीने आणि फायदेशीर होईल. तसेच खासगीकरण केल्यामुळे केवळ अंतराळ क्षेत्रालाच लाभ मिळेल, असं नाहीतर जागतिक अंतराळ क्षेत्रामध्ये देशाचा दबदबा वाढेल, असे के. सिवन यावेळी म्हणाले.
देशाच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी अवकाश क्षेत्र तयार असून, जागतिक अंतराळ क्षेत्रामध्ये भारत स्पर्धा निर्माण करू शकेन. अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं करून त्यात सुधारणा केली, तर या क्षेत्राचा विकास होईल आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळू शकेल.