महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

पवना धरणात 33.60 टक्के पाणीसाठा, गेल्या वर्षी भरले होते तुडूंब - पिंपरी-चिंचवड पाणी पुरवठा बातमी

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणार्‍या पवना धरणात यावर्षी कमी पाऊस झाल्याने 33.60 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी धरण 100 टक्के भरले होते. मात्र, सध्या पवना धरणात 33.60 टक्के पाणीसाठा असून आज अखेरीस एकूण 597 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाणी पुरवठ्याचे संकट
पाणी पुरवठ्याचे संकट

By

Published : Aug 4, 2020, 6:38 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण गतवर्षी शंभर टक्के भरले होते. परंतु, यावर्षी अत्यल्प पाऊस असल्याने केवळ 33.60 टक्के पवना धरणात पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या 24 तासात पाणलोट क्षेत्रात 59 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सकाळपासून दुपारी 12 पर्यंत 36 मिलिमीटर पावसाची नोंद झाली अशी आहे माहिती अधिकारी अन्वर तांबोळी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.

पिंपरी-चिंचवडसह इतर काही गावांना पवना धरणातून पाणी पुरवठा होत असतो. दरवर्षी मावळ परिसरात जोरदार पाऊस असतो. मात्र, यावर्षी पावसाने दडी मारली असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांपासून पावसाने पुनरागमन केल्याचे दिसत असून पावसाची संततधार सुरू आहे. एकीकडे वर्षभरापासून शहरवासीयांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात, यावर्षी पाऊस कमी होत असल्याने पाणी कपातीचे संकट अधिक गडद होऊ शकते.

सध्या पवना धरणात 33.60 टक्के पाणीसाठा असून आज अखेरीस एकूण 597 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी धरण 100 टक्के भरले होते. तसेच पावसाचे प्रमाण देखील जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. गेल्या वर्षी आज अखेरीस एकूण 2 हजार 313 मिलिमीटर येवढ्या पावसाची नोंद झाली होती. यावर्षी मात्र परिस्थिती काही वेगळीच असून शहरवासीयांसह भात शेती करणारा शेतकरीही संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details