मुंबई- मुंबईतील कोरोनाचा पहिला आणि मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आज केवळ एकच कोरोना रुग्ण आढळला आहे. गेल्या काही दिवसांपासून धारावीतील रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यात आज तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्ण संख्या आज नोंदवली गेली आहे.
धारावी सावरतेय.. आज आढळला केवळ एक कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या 2 हजार 335
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार धारावीत आज 1 कोरोना रुग्ण आढळला असून आता येथील एकूण रुग्णसंख्या 2 हजार 335 अशी झाली आहे. यापैकी 1 हजार 735 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 352 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. धारावी परिसर ज्या जी उत्तर विभागात आहे, त्या विभागातील दादरमध्ये आज 20 रुग्ण आढळले आहेत.
मुंबई महानगर पालिका आणि खासगी डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे गेल्या महिन्याभरापासून येथील रुग्ण संख्या कमी कमी होत चालली आहे. गेल्या काही दिवसात तर रुग्ण संख्येचा आकडा किती तरी वेळा 10 च्या आतच रोखण्यात पालिकेला यश आले आहे. आज तर धारावीत केवळ एकच रुग्ण आढळल्याने ही अतिशय दिलासादायक बाब मानली जात आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार धारावीत आज 1 रुग्ण आढळला असून आता येथील एकूण रुग्णसंख्या 2 हजार 335 झाली आहे. यापैकी 1 हजार 735 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 352 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. धारावी परिसर ज्या जी उत्तर विभागात आहे, त्या विभागातील दादरमध्ये आज 20 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार येथील रुग्णसंख्या 1 हजार 4 वर पोहोचली आहे. तर माहीममध्ये आज 11 रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या 1 हजार 275 वर गेली आहे. जी उत्तरची एकूण रुग्णसंख्या 4 हजार 614 झाली असून आतापर्यंत यातील 3 हजार 207 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 1 हजार 56 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.