नाशिक -कळवण तालुक्यातील दोन कृषी दुकाने फोडून कांदा बियाणे चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच कळवण - देवळा मार्गावरील कृषी केंद्र चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानातुन दीड लाख रुपयांचे कांदा बियाणे व रोख रक्कम लंपास केली आहे.
कळवण तालुक्यात मागील महिन्यात दोन कृषी दुकाने फोडून कांदा बियाणे चोरीला गेल्याची घटना घडली होती. आता पुन्हा बुधवारी रात्री कळवण - देवळा रस्त्यावरील गणेशनगर भागातील अतुल रौंदळ यांच्या किसान ट्रेडर्स या कृषी दुकानात चोरी झाली आहे. दुकानाच्या मागच्या बाजूचा पत्रा कापुन चोरट्यांनी आत प्रवेश करत नामांकित कंपनीचे सुमारे दीड लाख रुपये किमतीचे कांदा बियाणे व पाच हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे.