महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

हिंगोलीत एका वर्षाच्या चिमुरड्यासह 8 जण कोरोनाबाधित

शहरातील वंजारवाडा भागात एका वर्षाच्या चिमुरड्यालाही कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्याच्यासह कळमनुरी, वसमत आणि हिंगोलीत नव्याने 8 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

Hingoli corona update
Hingoli corona update

By

Published : Jul 29, 2020, 10:23 PM IST

हिंगोली- प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात हिंगोली शहरातील वंजारवाडा भागात एका वर्षाच्या चिमुरड्यालाही कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्याच्यासह कळमनुरी, वसमत आणि हिंगोलीत नव्याने 8 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कासारवाडा भागात एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शहरात गल्लोगल्ली कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने, चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी हिंगोलो शहरातील नाईक नगर 1, वंजारवाडा भागात 1, तलाबकट्टा 1, आझम कॉलनी 1, रिसाला बाजार 1, राज्य राखीव दल 1, कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथे 1, तर वसमत तालुक्यातील शिवपुरी 1 असे 8 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 593 झाली आहे. तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उपचारामुळे एकूण 421 रुग्णही बरे झाले आहेत.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील विविध कोरोना वॉर्ड, तसेच कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 165 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत जिल्ह्यात 7 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, एकूण 36 रुग्णही बरे झालेले आहेत, त्यामुळे त्यांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी देण्यात आली आहे. तर विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 19 रुग्णांची प्रकृती ही चिंताजनक असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन वर ठेवण्यात आले आहे.

आज घडीला हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डसह हिंगोली जिल्ह्यात ग्रामस्तरावर करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटर अंतर्गत 7 हजार 270 व्यक्तींना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 6 हजार 482 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून 7 हजार 712 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. आज घडीला 538 जण रुग्णालयात दाखल असून 223 जणांचे अहवाल हे प्रयोगशाळेकडे प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details