यवतमाळ- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एका जणाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण पॉझिटिव्ह आढळला आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह आलेले 16 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आज मृत्यू झालेला व्यक्ती (वय 75) हा नेर तालुक्यातील पाथ्रडगोळे येथील आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या 9 झाली आहे. तसेच आज यवतमाळ तालुक्यातील लाडखेड येथील एक पुरुष नव्याने पॉझिटिव्ह आला आहे. काल जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 67 होता, एक मृत्यू व एक नव्याने पॉझिटिव्ह आल्याने ही संख्या 67 वर स्थिरावली. मात्र आज 16 जणांना रुग्णालयातून सुट्टी झाल्यामुळे ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 51 वर आली आहे.