जळगाव - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील एमआयडीसी परिसरात कारवाई करत पावणेदोन लाख रुपये किंमतीचा गांजा आणि एक महागडी कार जप्त केली. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. शेख युसूफ शेख मुसा (वय 40, रा. बिलाल मशिदीजवळ, तांबापुरा, जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जळगावात पावणेदोन लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त - jalgaon crime branch action
हॉटेल सुमेरसिंगजवळ (एम एच 12 के एन 5169) क्रमांकाची कार घेऊन आरोपी शेख युसूफ हा गांजा घेऊन आला. त्याचवेळी पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. कारमध्ये 1 लाख 69 हजार 290 रुपये किंमतीचा 34 किलो गांजा मिळून आल्याने शेख युसूफला अटक करण्यात आली.
जळगाव शहरातील एमआयडीसीत एक जण कारने गांजा आणणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक बापू रोहोम, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक लोकरे, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, हेड कॉन्स्टेबल शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, जितेंद्र पाटील, सुनील दामोदरे, महेश पाटील यांच्या पथकाने एमआयडीसी परिसरात सापळा लावला होता.
हॉटेल सुमेरसिंगजवळ (एम एच 12 के एन 5169) क्रमांकाची कार घेऊन आरोपी शेख युसूफ हा गांजा घेऊन आला. त्याचवेळी पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. कारमध्ये 1 लाख 69 हजार 290 रुपये किंमतीचा 34 किलो गांजा मिळून आल्याने शेख युसूफला अटक करण्यात आली. पोलिसांनी गांजा आणि 5 लाख रुपये किंमतीची कार असा पावणेसात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल शरद भालेराव यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.