महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

धाकट्या भावाच्या मृत्यूनंतर थोरल्या भावानेही सोडले प्राण, 90 वर्षाच्या बंधूप्रेमाचा शेवट - सांगली बातमी

दोन सख्या भावांच्या मृत्यू एकाच दिवशी झाल्याची घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका गावात घडली. या दोघांचेही वय 90 पेक्षा जास्त होते. लहान भावाच्या मृत्यूनंतर काही वेळातच मोठ्या भावाने प्राण सोडले.

मृत महादेव आणि रामचंद्र
मृत महादेव आणि रामचंद्र

By

Published : Sep 22, 2020, 4:27 PM IST

सांगली - सख्ख्या भावांमधील वाद आणि एकमेकांना जीवे मारण्याच्या घटना समाजात पाहायला मिळतात. मात्र, अशातही बंधूप्रेमाच्या घटनाही पाहायला मिळतात. धाकट्या भावाच्या मृत्यूच्या धसक्याने थोरल्या भावाने प्राण सोडल्याची घटना जिल्ह्यातील मानकवाडी या गावात घडली आहे. एकाच दिवशी दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

मृत दोन्ही भावांनी नव्वदी पार केलेली होती. तब्बल ९० वर्षांचा दीर्घ प्रवास दोघांच्या मृत्यूने आज संपला. वाळवा तालुक्यातील महामार्गाच्या पश्चिमेला पेठ गावच्या कुशीत दडलेलं माणिकवाडी गाव. येथील रामचंद्र दादू गडाळे (वय ९८) आणि महादेव दादू गडाळे (वय ९०) हे सख्खे भाऊ होते. दोघांनीही आयुष्यभर मेंढ्यापालनाचे काम केले. भावाभावांत जीवापाड प्रेम होते. लहान भावाच्या मृत्यूनंतर मोठ्या भावानेही प्राण सोडले.

मागील काही दिवसांपूर्वी रामचंद्र बाथरूममध्ये पाय घसरून पडले होते. त्यानंतर काही दिवसांनी महादेव हे सुद्धा पाय घसरून पडले होते. त्यामुळे दोघे अंथरुणाला खिळून होते. त्यातच महादेव यांची प्रकृती ढासळल्याने मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळाने रामचंद्र यांचाही मृत्यू झाला. लहान भावाच्या मृत्यूनंतर काही वेळातच मोठ्या भावानेही जगाचा निरोप घेतला.


दोघांनीही गरीबी जवळून अनुभवली होती. परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना परंपरागत मेंढ्यापालनाचा व्यवसाय सुरु केला होता. रामचंद्र यांच्यासह चौघेजण भाऊ. पण यांच बंधुप्रेम गावात नावाजण्यासारखे होते. मेंढ्या पालन करत त्यांनी लहान भावांना आणि मुलांना उच्च शिक्षण दिले. या दोघांचीही मुले आज पोलीस दलात व नौदलात कार्यरत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details