महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

विजयासाठी नीता अंबानी म्हणतात तरी कोणता मंत्र, फॅन्सनी विचारला प्रश्न

मुंबईचा संघ जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्या पर्समध्ये बघून मंत्र म्हणत असल्याचे दिसून आले आहे.

नीता अंबानी

By

Published : May 14, 2019, 8:33 AM IST

मुंबई- आयपीएलच्या १२ व्या मोसमात मुंबईने चेन्नईला १ धावाने धूळ चारत पुन्हा एकदा आयपीएलकिंग असल्याचे सिद्ध केले. सांघिक कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा विजेतेपद पटकाविले. मुंबईच्या विजयाच्या वाटेत जितका खेळाडूंचा वाटा, तितकाचा संघाच्या मालकिण नीता अंबानी यांचाही वाटा आहे.


नीता अंबानी या प्रत्येक सामन्यात स्टेडियममध्ये उपस्थित राहून खेळाडूंना चिअरअप तर करतातच शिवाय त्या भर सामन्यात विजयासाठी मंत्र म्हणत असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. नीता अंबानी विजयासाठी कोणता मंत्र म्हणतात याची विचारणा फॅन्सकडून होत आहे. मुंबईचा संघ जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्या पर्समध्ये बघून मंत्र म्हणत असल्याचे दिसून आले आहे.


अंतिम सामन्यात मुंबईने ८ बाद १४९ धावा केल्या होत्या प्रत्युत्तरात चेन्नईला २० षटकांत ७ बाद १४८ धावाच करता आल्या. शेवटच्या चेंडूत चेन्नईला विजयासाठी २ धावांची गरज होती. मात्र, मलिंगाने ठाकूरला पायचीत करून चेन्नईच्या विजयाचा घास हिरावून घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details