सांगली - मुंबईसह कोकण किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका सांगली जिल्ह्यालाही काही प्रमाणात बसला आहे. जिल्ह्यात सकाळपासून वादळी वाऱ्यासह पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्याचे चित्र सध्या सांगली जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
निसर्ग वादळाचा सांगली जिल्ह्यालाही फटका, सकाळपासून पावसाची संततधार
मुंबईच्या दिशेने आलेल्या या चक्रीवादळामुळे सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्याच्या तासगाव, कवठेमहांकाळ,वाळवा मिरज, शिराळा, जत या तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपात पाऊस पडत आहे.
nisarga cyclone effected on sangli district
मुंबईच्या दिशेने आलेल्या या चक्रीवादळामुळे सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्याच्या तासगाव, कवठेमहांकाळ,वाळवा मिरज, शिराळा, जत या तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपात पाऊस पडत आहे. सकाळपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत होता आणि तो पाऊस सायंकाळपर्यंत सुरूच होता. परंतू या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.