महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

नाशिकमध्ये रेमडेसिवीरच्या वितरणाबाबत नवीन कार्यपद्धती, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Nashik remdesivir news

नाशिक जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. गरज असणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी रेमडेसिवीरच्या वितरणाबाबत नवीन कार्यपद्धती आजपासून लागू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

Nashik
Nashik

By

Published : Apr 14, 2021, 8:50 PM IST

नाशिक - जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. गरज असणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी रेमडेसिवीरच्या वितरणाबाबत नवीन कार्यपद्धती आजपासून लागू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. या व्यवस्थेद्वारे गरजू व्यक्तीपर्यंत उपलब्धतेच्या प्रमाणात अत्यंत पारदर्शकरित्या हे इंजेक्शन पोहोचवणे शक्य होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्षसुद्धा स्थापन करण्यात आलेला आहे. यामुळे सर्व प्रक्रियेवर त्याचे थेट नियंत्रण राहील, असेही मांढरे यांनी सांगितले.

रेमडेसिवीरसाठी नागरिकांचे आंदोलन

नाशिक जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून कोरोनाबाधित रूग्णांना लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन मिळण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. तसेच रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून चार दिवसांपूर्वी नातेवाईकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत सरकारचा निषेध केला होता. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत रुग्णांना हे इंजेक्शन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करू देण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र तरी सुद्धा रेमडेसिवीरचा पुरवठा अद्याप सुरळीत झाला नाही.

भुजबळांकडून पर्दाफाश

इंजेक्शन वाटपाची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाकडून काही रुग्णालयांना अत्यावश्यक पेक्षा अधिक इंजेक्शनचा पुरवठा केला जात असल्याचा पर्दाफाश नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला. यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. यावेळी भुजबळ यांनी तातडीने अन्न व औषध विभागाच्या राज्य सचिवांशी चर्चा करून यावर नियंत्रण आणण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता रेमडेसिवीरच्या वितरणाबाबत नवीन कार्यपद्धती आजपासून लागू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. या व्यवस्थेद्वारे गरजू व्यक्तीपर्यंत उपलब्धतेच्या प्रमाणात अत्यंत पारदर्शकरीत्या रेमेडेसिवीर पोहोचवणे शक्य होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्षसुद्धा स्थापन करण्यात आलेला आहे. यामुळे सर्व प्रक्रियेवर जिल्हाधिकारी कार्यालयाचे थेट नियंत्रण राहील, असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details