काठमांडू - नेपाळच्या खालच्या सभागृहाने नव्या सुधारित राजकीय आणि प्रशासकीय नकाशामध्ये दुरुस्तीला मान्यता दिली आहे. या नकाशात भारतातील काही प्रदेशांचा समावेश आहे. दोन तृतीयांश बहुमताने खालच्या सभागृहाने या नव्या नकाशाला संमती दिली आहे.
नेपाळची राज्यघटना (द्वितीय दुरुस्ती 2077) विधेयकामधील अनुसूचीच्या (Coat of Arms - शस्त्रास्त्रांचा कोट) आधारे नव्या अद्ययावत नकाशाला मंजुरी देण्यात आली. शनिवारी संसदेत झालेल्या मतदानाद्वारे याला मान्यता देण्यात आली. नेपाळच्या प्रतिनिधी सभागृहातील सदस्यांनी सुमारे पाच तासांच्या चर्चेनंतर दुरुस्ती विधेयकाला मतदान केले. संसदेच्या सदस्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी भारताशी बोलण्याची मागणी केली.