काठमांडू : भारत- चीन दोघांमधील सीमा वाद चर्चेने आणि शांततापूर्ण मार्गाने सोडवतील असा विश्वास नेपाळने व्यक्त केला आहे. जागतिक आणि प्रादेशिक स्थिरता लक्षात घेवून आमचे दोन्ही मित्र देश हा वाद सोडवतील असे नेपाळने म्हटले आहे. भारताचा नेपाळबरोबरही नुकताच सीमावाद सुरु झाला आहे. दरम्यान चीन भारत सीमा वादावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
बलाढ्य चीन आणि भारतामध्ये नेपाळ दबला गेलेला आहे. नुकतेच लिपूलेक, लिंपियाधुरा आणि कालापाणी हे भारताचे भाग नेपाळने आपल्या नकाशात दाखवण्याबाबत घटनादुरुस्ती केली आहे. त्यामुळे भारतासाठी दुसरी डोकेदुखी सुरु झाली आहे. पाकिस्तान, चीन आणि नेपाळ या तिन्ही शेजाऱ्यांशी भारताचे सीमा वाद सुरु आहेत.