मुंबई- आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजीच्या शैलीमुळे आणि अचूक यॉर्कर टाकणाऱ्या जसप्रीत बुमराहचे प्रत्येकजण कौतुक करत आहे. बुमराह भारतीय वेगावान गोलंदाजीची मदार सांभाळत आहे. युवा गोलंदाजही त्याच्या गोलंदाजीपासून प्रभावित झाले आहेत. आयपीएलमधील बंगळुरूच्या संघात खेळणाऱ्या नवदीप सैनीने बुमराहकडून यॉर्कर गोलंदाजी शिकायची इच्छा व्यक्त केली.
जसप्रीत बुमराहकडून मला यॉर्कर शिकायचाय - सैनी
नवदीप सैनीने आयपीएलच्या १३ सामन्यात ११ गडी बाद केले आहेत.
रणजीमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळणारा नवदीप सैनी याला आयसीसी विश्वकरंडकात भारतीय निवड समितीने नेट गोलंदाज म्हणून निवडले आहे. सैनी म्हणाला, आयपीएलमध्ये मी भारतीय संघातील वरिष्ठ गोलंदाजांशी चर्चा करत होतो. पण सर्वच गोलंदाज आयपीएलमध्ये व्यस्त असल्याने जास्त बोलणे झाले नाही. भूवीचा स्विंग, बुमराहचा यॉर्कर आणि शमीचा पिच करण्याची पद्धत खूपच चांगली आहे. मला अशा आहे की मी हे सर्व यांच्याकडून शिकून गोलंदाजीत परिपक्व होण्याचा प्रयत्न करेन.
भारतीय कर्णधार विराट कोहली विषयी बोलताना तो म्हणाला, की विराट कोहलीपासून मला खूप काही शिकायला भेटले. तो नेहमीच माझे प्रोत्साहन वाढविण्याचे प्रयत्न करत होता. त्यांनी मला कधीही मनावर दबाव घेऊ नये असे सांगितले. नवदीप सैनीने आयपीएलच्या १३ सामन्यात ११ गडी बाद केले आहेत.