महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

नाशिक महानगरपालिका उभारणार दोन एअर ऑक्सिजन प्लांट; मनपा आयुक्तांकडून जागेची पाहणी - Air oxygen plant nashik mnc news

नाशिक शहर व परिसरात काही दिवसांपासून ऑक्‍सिजनचा अपुरा पुरवठा होत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.

Nashik corona oxygen situation
नाशिक कोरोना ऑक्सिजन परिस्थिती

By

Published : May 4, 2021, 8:21 AM IST

नाशिक -शहरासह जिल्हाभरात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून ह्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.अनेक जणांना ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. यामुळे नाशिक महानगरपालिका आता शहरात दोन एअर ऑक्सिजन प्लांट उभारणार आहे. मोरवाडी व गंगापूर येथे एअर ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत आहे. या प्लांटवर शहरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही ठिकाणच्या जागेची मनपा पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी पाहणी करून नियोजनाबाबत संबंधित विभागाला सूचना केल्या.

नाशिक शहर व परिसरात काही दिवसापासून ऑक्‍सिजनचा अपुरा पुरवठा होत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून मोरवाडी येथे यूपीएससी लगतच्या मोकळ्या मैदानाची व प्रबोधनकार ठाकरे सभागृह गंगापूर रोड येथील बाजूच्या मोकळ्या जागेची पाहणी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव व अधिकाऱ्यांनी केली.

जागेची पाहणी करून या दोन्ही ठिकाणी ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिल्या. या प्लांटच्या माध्यमातून जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भरून देण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी मोरवाडी दवाखान्याची पाहणी करून तेथील कामकाजाची व औषध साठ्याची माहिती यावेळी आयुक्त जाधव यांनी घेतली तसेच गंगापूर येथील दवाखान्याची पाहणी करून तेथील औषधसाठा व रुग्णांना मनपाच्या वतीने दिल्या जात असलेल्या सेवेची आयुक्तांनी माहिती घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details