महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

लॉकडाऊन शिथिलता.. स्वारातीम विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयात शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून सुरुवात - शैक्षणिक वर्ष नांदेड विद्यापीठ बातमी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी दिलेल्या आदेशानुसार विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, विद्यापीठ परिसर, उपकेंद्र लातूर, परभणी, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली आणि किनवट येथील कै. उत्तमराव राठोड आदिवासी संशोधन केंद्र नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून, २०२० पासून सुरू होत आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

By

Published : Jun 16, 2020, 7:16 PM IST

नांदेड -येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, विद्यापीठ परिसर, उपकेंद्र लातूर, परभणी, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली आणि किनवट येथील कै. उत्तमराव राठोड आदिवासी संशोधन केंद्र नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून, २०२० पासून सुरू होत आहेत. याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी आदेश जारी केले आहेत.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार पुढील आदेश येईपर्यंत कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी १५ जूनपासून कार्यालय आणि महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. कर्मचारी संख्येची उपस्थिती शासन आदेशानुसार संख्येच्या १५ टक्के किंवा १५ कर्मचारी यापैकी जे अधिक असेल एवढी उपस्थिती संबंधितांनी अनिवार्य करावी. लॉकडाऊन कालावधीमधील प्रतिबंधामध्ये शिथिलता आणण्यासाठी टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उघडण्याकरता शासनाद्वारे कळविण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी परीपत्रकाद्वारे कळविले आहे. तसेच कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेतू अ‌ॅप वापरणे बंधनकारक आहे, असेही कळविण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details