गडचिरोली: लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना नक्षलवाद्यांनी जिल्ह्याच्या पूर्वोतर भागात बॅनर लावून निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
नक्षल्यांकडून निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन; ठिकठिकाणी लावले बॅनर - गडचिरोली
या बॅनरवर नक्षल्यांनी भाजपवर टीका केली असून, भाजप हा लोकविरोधी तसेच दलित, आदिवासी, मुस्लीम आणि महिलांवर अन्याय करणारा पक्ष असल्याने या पक्षास हद्दपार करा, असे आवाहन केले
येत्या ११ एप्रिलला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. परंतु दुर्गम भागात नक्षल्यांनी बॅनर लावून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कोरची तालुक्यातील मसेली, धानोरा तालुक्यातील देवसूर व भामरागड तालुक्यातील काही गावांलगत, असे बॅनर आढळून आले आहेत. या बॅनरवर नक्षल्यांनी भाजपवर टीका केली असून, भाजप हा लोकविरोधी तसेच दलित, आदिवासी, मुस्लीम आणि महिलांवर अन्याय करणारा पक्ष असल्याने या पक्षास हद्दपार करा, असे आवाहन करण्यात आले आहे.