नागपूर : नागपुरात शुक्रवारी सायंकाळी वेलट्रीट रुग्णलयाला आग लागल्याची गंभीर घटना घडली. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने या रुग्णालयासमोर आंदोलन केले. तसेच डॉक्टर व संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली.
डॉक्टर-संचालकांवर राजकीय आशीर्वाद
नागपूरच्या वाडी परिसरात वेलट्रीट हॉस्पिटल आहे. याला काल (शुक्रवार) अचानक आग लागली. त्यामुळे या रुग्णालयाच्या संचालक आणि डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून हातात फलक घेऊन आंदोलन करण्यात आले. या डॉक्टरांवर राजकीय आशिर्वाद असल्याने कारवाईस टाळाटाळ होत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनकर्त्यांनी केला आहे.