नागपुर - कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने स्वतःच्या ९ महिन्यांच्या चिमुकलीचा निर्घृण खून केला, आणि त्यांनतर स्वतःदेखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अलविना शेख असे या दुर्दैवी बाळाचे नाव आहे. तर सोनू शेख असे आरोपी बापाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील सक्करदारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडेप्लॉट चौकात असलेल्या शिवशंकर मठाशेजारील एका ड्रम मध्ये लहान बाळाचा मृतदेह असल्याची पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा नऊ महिन्याच्या अलविनाचा मृतदेह पाण्याने भरलेला ड्रम मध्ये तरंगत होता. त्याच्या शेजारीच सोनू शेख हा जखमी अवस्थेत पडलेला असल्याने त्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.