महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

बहिणीबद्दल वाईट चर्चा केल्याच्या रागातून बीडमध्ये एकाची हत्या - beed murder

आरोपीच्या बहिणीची वागणूक चांगली नसल्याचे तिच्या पतीला फोनवरून खोटी माहिती का दिली, याचा जाब विचारण्यासाठी आरोपी संजयच्या घरी गेला होता. त्याठिकाणी गेल्यानंतर बोतल असताना वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. आरोपीने संजयच्या छातीत वीट मारली. यातच संजयचा जागीच मृत्यू झाला.

beed crime news
beed crime news

By

Published : Jun 9, 2020, 4:36 PM IST

बीड - आपल्या बहिणीबद्दल आक्षेपार्ह चर्चा केल्याच्या रागातून एकाची हत्या झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील कानडी बुद्रुक येथे घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. संजय वणवळे (वय 40 रा.कानडी ता.आष्टी) असे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, आरोपीच्या बहिणीची वागणूक चांगली नसल्याचे तिच्या पतीला फोनवरून खोटी माहिती का दिली, याचा जाब विचारण्यासाठी आरोपी संजयच्या घरी गेला होता. त्याठिकाणी गेल्यानंतर बोलत असताना वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. आरोपीने संजयच्या छातीत वीट मारली. यात संजयचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विजय लागारे यांनी भेट दिली असून या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details