मुंबई- घरगुती जेवणाचे अन्न पाकीट संकलन व वितरण करणाऱ्या करुणा सेवा संस्थेने मुंबईमध्ये डब्बा पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांची होणारी आर्थिक कोंडी लक्षात घेऊन एक महिन्याच्या अन्नाचे 1 हजार रेशन किट तयार केले होते. या अन्नाच्या किटचे प्रातिनिधिक वितरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज महापौर निवासस्थानी करण्यात आले.
करुणा संस्थेकडून मुंबईतील डबेवाल्यांना एक महिन्याच्या रेशन किटचे वाटप; महापौरांच्या हस्ते वितरण - Mayor Kishori Pednekar destribute food kit
आतापर्यंत या संस्थेकडून साडेतीन लाख अन्न पाकिटांचे वितरण करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच, ज्यांना शक्य असेल त्यांनी या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, करुणा सेवा ही संस्था गत मार्च महिन्यापासून मुंबईतील बेघर तसेच गरजवंतांना अन्नाच्या पाकिटांचे वितरण करत आहे. प्रत्येक कुटुंबात जर 4 माणसांचे जेवण बनत असेल तर त्यांनी 5 माणसांचे जेवण बनवून एका व्यक्तीचे जेवण या संस्थेकडे सुपूर्द करायचे अशी सोपी ही संकल्पना आहे. संबंधित संस्थेचे प्रतिनिधी वांद्रे ते बोरिवली तसेच वडाळा ते सीएसटी या मार्गावर अन्न पाकीट संकलन करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवित असल्याचे महापौरांनी सांगितले.
आतापर्यंत या संस्थेकडून साडेतीन लाख अन्न पाकिटांचे वितरण करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले. ज्यांना शक्य असेल त्यांनी या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे. याप्रसंगी करूना सेवा संस्थेचे राहुल कोनाजी, कृतार्थ गोराडिया, उदय चंदाराणा, केतन दन्नाजी उपस्थित होते.