नवी दिल्ली- फिरोजशाह कोटला मैदानावर मुंबई आणि दिल्ली यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी १६९ धावांचे आव्हान दिले आहे. कृणाल आणि हार्दिक यांच्या आक्रमक फटेबाजीच्या जोरावर मुंबईने निर्धारित २० षटकात १६८ धावांपर्यंत मजल मारली.
MI vs DC: मुंबईचे दिल्लीपुढे १६९ धावांचे आव्हान - undefined
दोन्ही संघात आतापर्यत २३ वेळा आमना-सामना झाला आहे. त्यापैकी १२ सामने दिल्लीने तर ११ सामने मुंबईने जिंकले आहेत.
![MI vs DC: मुंबईचे दिल्लीपुढे १६९ धावांचे आव्हान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3041103-thumbnail-3x2-match.jpg)
रोहित-श्रेयस
दिल्लीच्या गोलंदाजांनी अचूक मारा केल्यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा ३०, डी कॉक ३५ , सूर्यकुमार यादव २६ तर कृणाल ३७ आणि हर्दिक ३२ धावा काढल्या. दिल्लीकडून कंगिसो रबाडा याने ३८ धावा देत २ गडी बाद केले. अमित मिश्रा आणि अक्षर पटेल याला प्रत्येकी १ गडी बाद करण्यात यश आले.
Last Updated : Apr 18, 2019, 9:52 PM IST