महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

सिंधुदुर्ग : सावंतवाडीत साकारणार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल - sawantwadi multi speciality hospital

पोलिसांच्या सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्राच्या जागेसह मैदान आणि वसाहतीजवळील जागेची या पथकाने पाहणी केली. लवकरच जागा निश्चित केली जाईल आणि रुग्णालयाचा आराखडा तयार केला जाईल, असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देसाई यांनी स्पष्ट केले.

sindhudurg news
multi speciality hospital will be held in sawantwadi at sindhudurg district

By

Published : Jun 15, 2020, 7:17 PM IST

सिंधुदुर्ग - सावंतवाडी येथे मल्टिस्पेशालिटी रूग्णालय साकारण्यात येणार आहे. सावंतवाडीतील पोलीस परेड मैदानाजवळील 18 गुंठे जागेची विविध खात्याच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. रूग्णालयासाठी जागा निश्चित करून नंतर आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनी दिली.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील, बांधकाम विभागाचे अधिकारी अनिल आवटी, राजन चव्हाण आदी उपस्थित होते.

तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील उप जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे जाहीर करून त्याचे भूमिपूजनही केले होते. मात्र, रूग्णालयासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न सुटला नव्हता. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी पोलीस परेड मैदानालगतची 18 गुंठे जागा योग्य असल्याचे सूचविले. त्याचा आराखडा सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस परेड मैदानाजवळील जागेची पाहणी करण्यात आली.

पोलिसांच्या सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्राच्या जागेसह मैदान आणि वसाहतीजवळील जागेची या पथकाने पाहणी केली. लवकरच जागा निश्चित केली जाईल आणि रुग्णालयाचा आराखडा तयार केला जाईल, असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देसाई यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details