महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

विमानतळाच्या फरशीवर झोपले धोनी आणि साक्षी, फोटो व्हायरल - ms dhoni and sakshi dhoni took a nap at airport photo virat

हा फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या ऑफिशियल अकाउंटवर त्यांचा फोटो शेयर करण्यात आला आहे.

विमानतळावर चक्क फरशीवर झोपले धोनी आणि साक्षी

By

Published : Apr 10, 2019, 5:01 PM IST

Updated : Apr 10, 2019, 5:14 PM IST

चेन्नई- आयपीएलच्या २३ सामन्यांत चेन्नई सुपर किंग्जने कोलकात्याला दणदणीत ७ गडी राखून धूळ चारली. या सामन्यानंतर बुधावारी सकाळी संघ जयपूरकडे रवाना झाला. यानंतर महेंद्र सिंह धोनीच्या इंस्टाग्राम अकांउटवर एक फोटो शेयर करण्यात आला. फोटोत साक्षी आणि धोनी जमिनीवर झोपल्याचे दिसत आहे.


हा फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या ऑफिशियल अकाउंटवर त्यांचा फोटो शेयर करण्यात आला आहे. ज्यावर फॅन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. धोनीने हा फोटो शेयर करत लिहिले, की जर आयपीएलच्या वेळेच्या आहारी गेलात आणि तुम्हची सकाळची फ्लाइट असेल तर तुमचे असेच हाल होणार.

Last Updated : Apr 10, 2019, 5:14 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ms dhoni

ABOUT THE AUTHOR

...view details